top of page

Dr NILESH MAHAJAN'S
ABHYANG MASSAGE THERAPY

योगविद्या वाचस्पती डॉ निलेश महाजन यांची अभ्यंग मसाज थेरपी

Dr Nilesh Mahajan's Abhyang Massage Therapy Treatment

योगविद्या वाचस्पती डॉ निलेश महाजन यांची अभ्यंग मसाज थेरपी

 

         अभ्यंग मसाज ही आयुर्वेदातील एक प्राचीन उपचार पद्धत आहे. औषधी सिद्ध तेलाचा वापर करून शरीराला विशिष्ट प्रकारे मसाज केला जातो. अभ्यंग हा संस्कृत शब्द आहे, शरीरातील वात, पित्त, कफ या तीन दोषांचे संतुलन राखण्यासाठी, शारीरिक तसेच मानसिक व्याधींसाठी अभ्यंग मसाज थेरपी उपयुक्त आहे. डॉ निलेश महाजन यांनी त्यांच्या अनुभवातून आणि कौशल्यातून ही विशिष्ट प्रकारची अभ्यंग मसाज थेरपी विकसित केली आहे, ज्याचा अनेकविध आजारांवर सकारात्मक फायदा अनेक रुग्णांनी अनुभवला आहे.

डॉ निलेश महाजन संशोधित अभ्यंग मसाज थेरपी कशी केली जाते?

    शरीरावर मालिश करण्यासाठी रुग्णाचे परीक्षण करून आजार, दोष, प्रकृती नुसार विशिष्ट औषधी तेल निवडले जाते. औषधी तेल सुखोष्ण करून शरीरावर सौम्य वर्तुळाकार, वक्र, सरल गतीने ताडन,पिडण अशाप्रकारे विविध  मसाजचे स्ट्रोक्स वापरून मसाज केला जातो. प्रभावित अवयव यांना विशेष पद्धतीने मसाज करतात. मसाज करताना आयुर्वेदातील मर्म स्थानांचा विचार केला जातो, ज्या ठिकाणी मसाज केल्यामुळे तेथील प्राणशक्तीचे वहन व्यवस्थित होते, तसेच ॲक्युपंक्चर मधील काही विशिष्ट पॉईंट वरती मर्दन केले जाते. विशिष्ट प्रकारे मसाज झाल्यावर औषधी वनस्पतींचा काढा वापरून वाफ दिली जाते,ज्यामुळे रुग्णाच्या वेदना, दुखावा, सूज कमी होण्यास मदत होते. आजारानुसार हे औषधी द्रव्ये बदलतात, तसेच आवश्यकता पडल्यास औषधी वनस्पतींची पाने वापरून (पत्रपोट्टली) केला जातो आणि औषधी लेप करून आयुर्वेदाच्या शल्य चिकित्सेतील पट्टबंधन केले जाते. ज्यामुळे अधिक कालावधी पर्यंत औषधी द्रव्ये प्रभावित भागावर कार्य करतात. 

डॉ निलेश महाजन विकसित अभ्यंग मसाज थेरपीचे प्रकार

आजारानुसार कोणता अभ्यंग करावा यानुसार त्याचे विविध प्रकार पडतात.

  1. अभ्यंग मसाज

  2. उद्वर्तन मसाज (Medicinal Powder Massage)

  3. मर्दन मसाज (Deep  Tissue Massage)

  4. व्हॅक्युम मसाज (Vaccum Massage)

  5. पॅरालिसिस मसाज (Paralysis Massage)

  6. स्पाईन केअर मसाज – पाठीच्या मणक्यांच्या आजारांसाठी

  7. सूतिका अभ्यंग : बाळंतीन आईच्या आरोग्यासाठी विशेष मसाज

यासोबत अक्षीतर्पण, कर्णपुरण, परिषेक, संवाहन, शिरोभ्यंग, हृद्यधारा, परिषेक, पादाभ्यंग असे वेगवेगळे स्नेह अभ्यंगाचा वापर केला जातो. वरील पैकी १ किवा २ मसाज प्रकार रुग्ण तपासणी करून आजार, तीव्रतेनुसार एकत्र करून वापरले जातात. आवश्यकतेनुसार आयुर्वेदातील शरीरशुद्धिकरण चिकित्सेचा वापर केला जातो.

अभ्यंग मसाज थेरपी चे फायदे: -

     नियमित अभ्यंग केल्याने त्वचा चांगली राहते. अत्याधिक काम व्यायाम यामुळे मांसपेशी आणि स्नायूंमधील येणारा थकवा दूर व्हायला मदत होते. अभ्यंगातील तेल स्नेहयुक्त असल्याने वातदोष कमी करते. दृष्टी सुधारते, झोप चांगली लागते, स्नायूंची ताठरता कमी होवून लवचिकता वाढते व स्नायू पिळदार होतात. त्वचेची कांती सुधारते, विशिष्ट पद्धतीने केलेला अभ्यंग मेंदूला उत्तेजित करतो. उत्साह वाढविणाऱ्या संप्रेरकाचे(हार्मोन) प्रमाण वाढवतो. अभ्यंग केलेल्या अवयवाचा रक्तपुरवठा वाढतो, त्यामुळे विषाक्त द्रव्य बाहेर टाकले जातात आणि पोषण मूल्याचा पुरवठा व्यवस्थित केला जातो. सेरेटोनिन व इतर प्रकारचे न्यूरोट्रान्समीटर चे प्रमाण मसाजमुळे वाढवले जाते, जे चिंता, नैराश्य व ताणतणाव कमी करायला मदत करते. हृदयाकडे रक्त सहजरित्या पाठवले जाते, या सर्वांमुळे शरीरामध्ये एक नवचैतन निर्माण होते. वेदना, दुखावा सूज कमी होवून अवयवांची कार्यक्षमता वाढते.

 

अभंग मसाज थेरपी कोणासाठी उपयोगी?

संधिवात: गुडघेदुखी, आमवात, वातरक्त, लिगॅमेंट किवा कुर्चा फाटने किंवा झीज होणे, तसेच चिकन गुनिया नंतर होणारी सांधेदुखी, सांध्यातील वंगण कमी होणे.

मणक्यांचे आजार: पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी , स्पॉडीलायटीस, मणक्यातील गादी सरकणे (सायटिका), हातापायाला मुंग्या येणे, चालताना कमरेपासून पाय दुखणे.

पॅरालिसिस: अर्धांग वायू, लकवा, अंगावरून वारे जाणे, चेहऱ्याचा पक्षघात (Fascial Paralysis) मणक्याला मार लागल्यामुळे निर्माण होणारा, मेंदूची कार्यक्षमता कमी होणे, सेरेब्रल अट्रॉफी

तणावजन्य आजारांवर: निद्रानाश, मायग्रेन, पित्त उठणे, आळस, शरीर दुर्बलता, मानसिक अस्वस्थता वाटणे.  

पोटाचे आजार: बद्धकोष्ठता, मुळव्याध, पचन तंत्र बिघडणे, आतड्यांना सूज असणे

हृद्य विकार: उच्च रक्तदाब, रक्ताभिसरणातील अडचणी,

त्वचा विकार: सोरीयासीस , नायटा , इसब इतर त्वचा रोग

केसांचे आजार: केस गळणे, चाई पडणे कोंडा होणे, केसांची वाढ न होणे  

 

संपर्क : फोन नं : ९६६५८२३१०३

डॉ निलेश महाजन यांचे

आयुर्वेद अभ्यंग मसाज व योग उपचार केंद्र

डॉ निलेश महाजन

आयुर्वेद तज्ञ, योगविद्या वाचस्पती(PhD,योग)

योग प्रमाणीकरण मंडळ प्रमाणित योग शिक्षक

 

डॉ भक्ती महाजन

आयुर्वेद व योग तज्ञ ,

संचालक : योग महाविद्यालय , बारामती

 

दवाखाना: १) शरद प्राईड, पहिला मजला, हॉटेल निलम पलेस समोर, गुलाबराव ढवाण पाटील चौक, फलटण रोड , कसबा , बारामती ( वेळ सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत )

२)  समृद्धी कॉम्प्लेक्स, पहिला मजला , लेन नं २ , सुर्यनगरी, साई समर्थ दातांच्या दवाखाना, दर गुरुवार संध्या ४ ते ८ वाजेपर्यंत   

  © 2025 by Pranyoga - All Rights Reserved                                                                                                                                           Designed By :-  VAIBHAV Editing Studio

bottom of page